ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या आरोपीला वर्धा पोलीसांनी घेतले ताब्यात

नागेशकुमार चतरकर पोलीस निरीक्षक वर्धा व वर्धा डी. बी. पथकांची उत्कृष्ट कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादीच्या तक्रारी वरुन पोलीस स्टेशन वर्धा शहर दिनांक 8/8/2026 रोजी नालंदा नगर महिला आश्रम वर्धा येथून होंडा ॲक्टिवा क्रमांक एम. एच. 32-बी.यफ-1546 किंमत अंदाजे 60.000/- रुपये चोरीस गेलेली आहे या वरुन पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपराध क्रमांक 1303/2026 कलम 303(2) बीएनएस गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला पोलीस स्टेशन वर्धा शहर यांना दिनांक 9/9/2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी नामे अनुराग प्रविण धाबर्डे वय 21 वर्षे राहणार तलोडी तहसील सेलू जिल्हा वर्धा यास ताब्यात घेऊन चौकशी केली असताना आरोपीने कबुली दिली की सदर गुन्हातील चोरीची ॲक्टिवा तसेच इतर ठिकाणी चोरी केलेल्या वाहनांबाबत माहिती दिली वर्धा नागपूर आणि चंद्रपूर येथून चोरी केल्याची कबुली दिली की आरोपी कडून चार चोरीचे वाहने जप्ती करण्यात आली आहे या मध्ये ईतर गुन्हांचा उलगडा करण्यात आला पोलीस स्टेशन हिंगणा जिल्हा नागपूर गुन्हा क्रमांक 384/26 कलम 303(2) होंडा शाईन एम. एच. -40-बी.एम.1977 अंदाजे किंमत 50,000/-रुपये पोलीस स्टेशन राजुरा जिल्हा चंद्रपूर गुन्हा क्रमांक 713/2026 कलम 303(2) बीएनएस राॅयल इनफिल्ड एम.एच.34- ऐएस-1120 अंदाजे किंमत 1,50,000/- रुपये पोलीस स्टेशन वर्धा शहर गुन्हा क्रमांक 1508/26 कलम 303(2) बी एन एस हिरो होंडा स्पेन्डर प्लस एम एच -32- एस-8869 अंदाजे किंमत 15,000/- रुपये असा एकूण चार दुचाकी वाहने अंदाजे किंमत 2,15,000/-रुपये जप्त करण्यात आले असून इतर चोरीचे उघडकीस येण्याची शक्यता आहे आरोपीला वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे आरोपीला दिनांक 10/9/2026 ते 11/9/2026 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला असून आरोपीकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे वाहनांची विल्हेवाट व इतर साथीदार याबाबत तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वर्धा शहरचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड पोलीस हवालदार महेंद्र पाटील पोलीस हवालदार अभिजित वाघमारे पोलीस शिपाई रंजीत भुरसे व पोलीस शिपाई अमोल साळवण यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये