ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूर गुडा येथे सेवानिवृत्त भारतीय सैनिक मनोज आडे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील कोल्हापूर (गुडा) या छोट्याशा खेडेगावात असलेले निवृत्त सैनिक मनोज देवराव आडे यांनी नुकतेच भारतीय सैनिक सेवेमधून निवृत्तीची घोषणा केली. अगदी वयाच्या लहानपणापासूनच मनामध्ये सैनिक बनण्याची आणि देशावर प्रेम करण्याची भावना असणे हे अत्यंत अभिमानास्पद आणि मोलाचे आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या आयुष्याची महत्त्वाची 18 वर्षे देशसेवेची सीमेवर सेवा करत सुखरूप घरी परतल्यावर जवानाचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.

 बैलपोळा या सणानिमित्ताने कोल्हापूर (गुडा) येथील प्रथम नागरीक गावपाटील मंगेश पंधरे यांच्या नेतृत्वात या सेवानिवृत्त सैनिकाचा सन्मान म्हणून कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला होता.

यावेळी समारंभाला उपस्थित गावाचे प्रतिष्ठीत नागरीक गजानन पंधरे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब मेश्राम , बाळा मडावी, रामक्रिष्णा पंधरे, अजय कुमरे, अरविंद परचाके, अंकुश मडावी व कोल्हापूर (गुडा) येथील समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते..!

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये