ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रबोधनात्मक कार्यक्रमातून “आंतरराष्ट्रीय स्वच्छ वायू दिवस” संपन्न

महानगरपालिका चंद्रपूरचे यशस्वी आयोजन ; परिवर्तन संस्थेच्या पथनाट्य सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

चंद्रपुर शहर महानगरपालिका चंद्रपूरच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्वच्छ वायु दिवस विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वच्छ हवा, निरोगी जीवन आणि प्रदूषण मुक्त चंद्रपुरचा संकल्प करीत साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चंद्रपुरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन और स्वागत समारोहाने करण्यात आली. यावेळी महापौर संगीता खांडेकर, आयुक्त अकुनारी नरेश, आई.ए.एस., उपायुक्त संदीप चिद्रवार,मुख्य स्वच्छता निरीक्षक डॉ. शेळके यांच्यासमवेत महानगरपालिकाचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

खालसा कॉन्वेंट प्राचार्या सिमरन सहानी, पैरामाउंट कॉन्वेंट बाबूपेठचे प्राचार्य फयाज अहमद,

लोकमान्य कन्या विद्यालयच्या प्राचार्या प्रांजली महादानी, कोटनाके सर, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष राजेश डोंगरे यांची विशेष उपस्थिति होती.

स्वच्छ हवा, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण या विषयावर विद्यार्थि, शिक्षक आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून सवाल_जवाब च्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण, प्रदूषण या विषयावर माहिती देण्यात आली. तसेच जेरूलस ग्रुप ऑफ डान्स यांनी आकर्षक नृत्य सादर करून स्वच्छता आणि पर्यावरणाचा संदेश दिला.

दरम्यान, प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्याकरिता स्थानिक गांधी चौक ते आझाद बगीचा चौकापासून कस्तुरबा गांधी मार्गे गिरनार चौक ते गांधी चौकापर्यंत सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी स्वच्छता आणि पर्यावरणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांचा तसेच विविध सामाजिक संस्था आणि कलाकारांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोनाकरिता स्वच्छता विभागाचे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. शेळके, शहर समन्वयक गिरीराज आणि स्वच्छता विभागाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या माध्यमातून चंद्रपूर शहराला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेऊन आपली जवाबदारी समजून काम करण्याचा संदेश देण्यात आला.

*पथनाट्य कार्यक्रमातून “परिवर्तन संदेश!”*

परिवर्तन ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था गोजोलीच्या वतीने प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्यच्या माध्यमातून प्रदूषणाचे दुष्परिणाम, स्वच्छ हवा, हरित चंद्रपूर_स्वच्छ चंद्रपूर, प्लास्टिकमुक्ती, वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, आपली जबाबदारीचा संदेश नागरिकांना देण्यात आला. याप्रसंगी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष राजेश डोंगरे यांच्यासह संपूर्ण पथनाट्य चमुतील कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये