विश्वशांती विद्यालयात स्व. वामनराव गड्डमवार यांची जयंती साजरी
जयंती प्रित्यर्थ विविध उपक्रम व बौद्धिक स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री स्व. वामनराव पाटील गड्डमवार यांची ८९ वी जयंती विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे विविध उपक्रम आणि बौद्धिक स्पर्धा घेऊन साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय वामनराव पाटील गड्डमवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
स्वर्गीय वामनराव पाटील गड्डमवार यांनी सामाजिक, राजकीय,शैक्षणिक आणि कृषीक्षेत्रात भरीव कामगिरी करून सबंध महाराष्ट्रात अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी म्हणून आपली ओळख निर्माण केली असे अध्यक्षीय भाषणातून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी विचार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेश झोडे,ज्येष्ठ शिक्षक किशोर संगीडवार कॉन्व्हेंटचे प्राचार्य पांडुरंग अमृतवार,राजू केदार धनंजय गुरनुले,राजश्री बिडवई आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यालयाचे उच्च माध्यमिक शिक्षक धनंजय गुरनुले यांनी गड्डमवार साहेबांच्या जीवन कार्यावर सखोल प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.
लोकनेते स्वर्गीय वामनराव पाटील गड्डमवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून विश्वशांती विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.स्पर्धेत क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सुधीर जीवतोडे यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका काजल बारापात्रे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक तथा शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



