वृक्षांना बांधली प्रेमाची राखी
‘वृक्ष रक्षाबंधन’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा ईको-प्रोचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
रक्षाबंधनाच्या पवित्र सना निमित्ताने भाऊ-बहिणीच्या नात्यासोबतच मानव आणि निसर्गातील अतूट नाते अधोरेखित करणारा ‘वृक्ष रक्षाबंधन’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुरक्षा नगर,विजासन रोड लगत असलेल्या पिपळाच्या झाडाला अवैद्य रीत्या कापण्या पासुन वाचविण्यात आलेल्या वृक्षाला राखी बांधून शहरातील वृक्षंच्या संरक्षणाची व संवर्धनाची शपथ घेण्यात आली.वृक्ष हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून ते आपल्याला प्राणवायू, सावली, फळे तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेले योगदान देतात. त्यामुळे केवळ रक्षाबंधनाच्या दिवशीच नव्हे, तर वर्षभर वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.यावेळी सहभागी नागरिक, विद्यार्थी व पर्यावरणप्रेमींनी वृक्षांना राखी बांधून “वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा” असा संदेश दिला. तसेच अधिकाधिक वृक्ष लागवड करून लावलेल्या रोपांची नियमित काळजी घेण्याचा संकल्प करण्यात आला.“ज्याप्रमाणे भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या वृक्षांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारूया,” असा संदेश यावेळी देण्यात आला.वृक्षरक्षणाची भावना जनमानसात रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून, वृक्षांना राखी बांधण्यापेक्षा त्यांचे आयुष्यभर रक्षण करणे हीच खरी ‘वृक्ष रक्षाबंधनाची’ भावना आहे, असे आयोजकांनी सांगितले.
या प्रसंगी जि.प.हायस्कुल च्या विद्यार्थीनी, शिक्षीका माधुरी आंबीलकर, कल्पना बांधुरकर, सुनंदा खंडाळकर, निषा ठाकरे, प्रगती कांबळे, गुरूदेव सेवा मंडळचे अमोल गावंडे व इको.प्रो चे ता.अ. संदिप जिवने, किशोर खंडाळकर,हनुमान घोटेकर,अमोल दैलतकर,अभिनव लोहकरे,शुभम मेश्राम व स्थानीक नागरीक उपस्थीत होते



