Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयात विद्यार्थी आणि स्पर्धा कार्यक्रम

कार्यक्रमास महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर चे विद्यार्थी व कर्मचारी वृंद उपस्थित होते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- सध्याचे युग हे अत्यंत स्पर्धेचे आहे, या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे गरजेचे आहे. ज्ञानकक्षा रुंदवण्यासाठी वाचनासारखा दुसरा पर्याय नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ वाचनात घालवावे असे प्रतिपादन एडवोकेट धनंजय चिताडे यांनी केले. ते प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी आणि स्पर्धा या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे होते. यावेळी रमेश राठोड, प्रा इजाज शेख, प्रा . राहुल ठोंबरे, प्रा. जाधव, प्रा. मनिषा मरस्कोल्हे, प्रा.सचिन पवार,प्रा .खाते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक अविनाश पोईनकर लिखित प्रेरणा गीताने करण्यात आली. पुढे बोलताना ॲड.धनंजय चिताडे यांनी विद्यार्थी हा ज्ञानपीपासू असला पाहिजे, जिज्ञासावृत्ती सदोदित वृद्धिगत करीत ज्ञानकक्षेचा आवाका विस्तारण्यासाठी वेगवेगळ्या विषयावरील विस्तृत वाचन करणे गरजेचे आहे.नियमित वर्तमानपत्र प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.

जगातील इत्यंभूत माहिती सहज उपलब्ध होणारे वर्तमानपत्र हे महत्वाचे माध्यम असल्याने, वाचणे आवश्यक आहेच. त्यांनी जगातील क्रांत्या, पराक्रमी पुरुषाचे कर्तृत्व, नेपोलियन ते नरेंद्र मोदीजी असे विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्य नानेश्वर धोटे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन ॲड.धनंजय चिताडे यांचा सत्कार करण्यात आला. रमेश राठोड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचलन प्रा.मनिषा मरस्कोल्हे यांनी तर प्रास्ताविक प्रा.एजाज शेख यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.राहुल ठोंबरे यांनी मानले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर चे विद्यार्थी व कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साक्षी डाखरे, आचल किन्नके, जिवन पोटदुखे,मयुरी कोल्हे,शेखर कोहपरे ,अमित निपुंगे यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये