ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेची उद्याला बैठक

चांदा ब्लास्ट

महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालकमालक संघटनेची बैठक रविवार, दि. २३ ऑगस्‍ट २०२६ ला, वेळ सायं. ०६.०० वा., स्‍थळ – हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५, येथे आयोजित केलेली आहे. बैठकीला संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष तसेच राज्‍य कार्यकारीणी संघटन प्रमुख राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष व विदर्भ संघटन सचिव मधुकर राऊत, जिल्‍हा सचिव सुनिल धंदरे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष विनोद चन्‍ने यांच्‍या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे. चंद्रपूर जिल्‍हयातील पदाधिकारी व सर्व ऑटोरिक्षा चालक यांनी वेळेवर बैठकीला उपस्थितीत राहावे.

१. बैठकीमध्‍ये राज्‍यस्‍तरीय अधिवेशन कोल्‍हापूर किंवा सांगली येथे आयोजित करण्‍यात येणार आहे. तिथे जाण्‍याकरीता चर्चा करण्‍यात येणार आहे.

२. राज्‍यस्‍तरीय ऑटोरिक्षा चालकांचे कल्‍याणकारी महामंडळ स्‍थापिक झाले आहे. त्‍या मंडळाची अध्‍यक्ष व कार्यकारीणी लवकरात लवकर ठरविण्‍यात येणार आहे.

राज्‍यामध्‍ये ऑटोरिक्षा चालकांना मराठी भाषा बोलण्‍याचे सक्‍तीचे आदेश शासनाने काढलेले आहे. मराठी बोलाल तरच गाडी चालवा त्‍यामुळे ज्‍यांना मराठी भाषा येत नसेल अशांना कोचिंग क्‍लास घेवुन मराठी बोलणे शिकविण्‍यात येणार आहे. ज्‍यांना मराठी बोलता येत नसेल त्‍यांनी संघटनेच्‍या पदाधिका-याकडे नावे देण्‍यात यावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये