ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डोलारा तलाव परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

९ जणांना अटक : ५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 पोलिसांनी डोलारा तलाव परिसरातील पंचशील नगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ९ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, ७ दुचाकी व ६ मोबाईल फोन असा एकूण ५ लाख ९८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना ३० जुलै रोजी रात्री मुखबिरामार्फत माहिती मिळाली होती की, डोलारा तलाव परिसरातील पंचशील नगर येथे काही इसम हार-जीतवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना धीरज शंकर शेट्टी (३२), रूपकेश भांकर मडावी (२५), मुकेश वासुदेव सोना (३५), अजित शंकर शेट्टी (२८), मनू वासुदेव सोना (३८), अमित ओमप्रकाश टेंभूर्णे (२६), उमेश भागसराव रणदिवे (३५), राकेश नामदेव कुंभेठे (३५) आणि सोनू ज्ञानेश्वर डेंगळे (३६) यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून ७ मोटारसायकली, ६ मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ५,९८,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोउपनि गजानन तुपकर, संतोष केदार, सपोनि महेंद्र बेसरकर, पोहवा अनुप आस्तनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकलबवार, पो.ऑ. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड व भद्रावती पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये