दीनदयाल विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल नामाचा गजर!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, दे.राजा येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल!” या नामगजराने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य भगवानर आरसोडे हे होते. .संदीप डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व नैतिक महत्त्व समजावून मार्गदर्शन केले.यावेळी पर्यवेक्षक .राजेश भिवटे,माजी पर्यवेक्षक . रमेश डोईफोडे तसेच शारीरिक शिक्षक .राजूसिंग राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .व्ही.यू.दाभाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक एस.आर.जायभाये यांनी मानले.या प्रसंगी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी भक्तिगीते, गवळणी, फुगडी, अभंग आणि विठ्ठल भक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.



