ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्का आत्राम यांची भाजपा महिला आघाडी प्रदेश महामंत्री पदी फेर नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा :_ राजकारण तसं सामान्य कुटुंबातील माणसाचं काम नसल्याचं म्हंटल्या जाते, परंतू अगदी सामान्यातील सामान्य कुटुंबातील अल्का आत्राम याला अपवाद ठरल्या. जिल्ह्यातील अविकसित समजल्या जाणाऱ्या पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी गावच्या अल्का आत्राम यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री म्हणून फेर नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आघाडी प्रदेश कार्यालयाकडून नुकतीच ही नियुक्ती करण्यात आली आहे.

जि. प. सदस्य, पंचायत समिती सभापती आणि महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री.जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी राहिल्यानंतर त्यांना मागील काही वर्षांपासून महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. पोंभूर्णा तालुक्यातील भाजपाच्या चिकाटीच्या कार्यकर्त्या म्हणून आजही त्यांच्याकडे बघितल्या जाते जनतेच्या कामासाठी सतत धडपड आणि पार्टी साठी समर्पण यामुळे नेहमीच त्या इतर नेत्या पेक्षा वेगळ्या राहिल्या.. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अतिशय विश्वासू कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. सोबतच महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा आ चित्रा वाघ यांनी अल्का आत्राम यांच्यातील कामाची तत्परता कर्तव्यदक्षता आणि पार्टी साठी समर्पण या भावनेमुळे वाघ या अल्का आत्राम यांच्यावर नेहमीच जावडीकता आणि विश्वास दाखवला त्यामुळे अल्का आत्राम त्यांच्या यशस्वी राजकीय कार्याची दखल घेत त्यांची भाजपा महिला आघाडी प्रदेश महामंत्री म्हणून फेर नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या या फेर नियुक्तीबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार,आ देवराव भोगळे,जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष विजया डोहे नीलम सुरमवार लक्ष्मी सागर बंदना सिन्हा सुलभा पीपरे सर्व तालुका अध्यक्ष महामंत्री, पोंभुर्णा भाजपातील सर्व आघाड्यांनी अल्का आत्राम यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये