शिवाजी पाटील कुहिरे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा :- तालुक्यातील वाणेगावचे रहिवासी शिवाजी पाटील कुहिरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख (शिंदे गट) सिनगाव गाव जहागीर चे उपसरपंच यांची देऊळगाव राजा तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरी बघत त्यांचे कौतुक करून त्यांचा कार्याची दखल घेऊन गट शिक्षण अधिकारी सपकाळ साहेब यांनी त्यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आजपर्यंत त्यांनी तालुक्यामधील कित्येक गावातील जे गोरगरीब पालक आहे ते त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना शिकवू शकत नाही.
अशा कित्येक विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून त्यांना सायकल,वही,पेन,पुस्तके,स्कूल बॅग चे दरवर्षी स्वखर्चाने वाटप करत असतात आसपासच्या सर्व गावांमध्ये केव्हाही मदतीचा हात गोरगरीब जनतेसाठी त्यांचा समोर असतो.कित्येक गावातील मुलांची शिक्षणाची आवड असते परंतु आपल्या घरच्या परिस्थितीमुळे त्यांचे पालक त्यांना शिकवू शकत नाही परंतु तेथे शिवाजी पाटील कुहिरे त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करून मदत करतात अशा या त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन स्वतः गट शिक्षण अधिकारी सपकाळ साहेब यांनी त्यांचा स्वतः पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे कौतुक केले . यावेळी वाणेगाव जिल्हा परिषद च्या मुख्याध्यापिका डोंगरे मॅडम, केंद्रप्रमुख आढाव साहेब व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.



