ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन दुचाकी चालकांच्या पालकांचे समुपदेशन व मार्गदर्शन

ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांचा स्त्यूत उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

रस्ता अपघातांना आळा घालणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने गोंडपिंपरी पोलीस ठाण्याच्या वतीने आज दिनांक २० जुलै रोजी अल्पवयीन दुचाकी चालकांच्या तेरा पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित पालकांना अल्पवयीन मुला-मुलींना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्यास देऊ नये, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व, विनापरवाना वाहन चालविण्यामुळे होणारे धोके तसेच अशा प्रकरणांमध्ये पालक व वाहनधारकांवर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पालकांची असल्याने त्यांना वाहन चालविण्यास परवानगी देऊ नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करण्याबाबत जागरूकता निर्माण करावी तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची सवय मुलांमध्ये रुजवावी, असे आवाहन करण्यात आले.

यापुढे अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना आढळल्यास संबंधित वाहनधारक व पालकांविरुद्ध प्रचलित मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

    गोंडपिंपरी पोलीस ठाण्यामार्फत रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत निरंतर जनजागृतीसाठी अशा प्रकारची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असून, याकरिता अल्पवयीन असलेल्या शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

*_रमेश हत्तीगोटे, ठाणेदार, पोलिस स्टेशन,गोंडपिंपरी*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये