Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

प्राथमिक आश्रम शाळेतुन 5 विद्यार्थी पळाले – पहाटे 4 वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांनी ठोकली धुम

आश्रमशाळा प्रशासन होते कुंभकर्णी झोपेत - विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची ऐशीतैशी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा तालुक्यातील एका प्राथमिक आश्रम शाळेतील 5 वी ते 7 वी दरम्यान शिकत असलेले 5 विद्यार्थी पहाटे 4 वाजताच्या सुमारास शाळेतुन पळून गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार त्या आश्रमशाळेत चंद्रपूरसह लगतच्या इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असुन शाळा प्रशासनाच्या अव्यवस्थेचे बळी ठरत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अहेरी तालुक्यातील 5 व्या वर्गात शिकणारी 2 मुले व 7 व्या इयत्तेतील 3 मुले आश्रमशाळेतुन पहाटे 4 वाजताच्या सुमारास अंधारात चिखल तुडवत आपले सामान घेऊन शिक्षणाला रामराम ठोकत पळुन गेले.

ह्या विद्यार्थ्यांनी पहाटेच्या अंधारात महामार्गावर पोहचून प्रयत्नपूर्वक ट्रक थांबविला व ट्रकने राजुरा बस स्थानकावर पोहचले. येथून आपल्या गावाकडे जाण्यासाठी हे विद्यार्थी बसची वाट बघत होते. पहाटे 6:00 वाजताच्या सुमारास एक पत्रकार तिथे गेला असता समान घेऊन पाच मुले बसली असल्याचे लक्षात आल्याने त्याला संशय आला. पत्रकाराने केलेल्या चौकशीत विद्यार्थ्यांनी सांगितले की, ते आश्रमशाळेत शिकत असुन घरी जाण्यासाठी निघाले आहेत. अधिक चौकशी केली असता विद्यार्थी शाळेतून पसार झाल्याचे शाळेतील कुणालाही माहिती नसल्याचे वास्तव समोर आले. विद्यार्थ्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले ह्याबाबत विचारणा केली असता मिळालेली माहिती हादरवून टाकणारी होती.

अखेरीस त्या पत्रकाराने विद्यार्थ्यांची समजुत काढून प्रयत्नपूर्वक शाळेशी संपर्क साधला व विद्यार्थ्यांची पहाटे शाळेतून परस्पर घरी जाण्यास निघाले असल्याची माहिती शिक्षकाला कळविली. त्यानंतर एक शिक्षक धावतपळत बस स्थानकावर पोहचल्यानंतर त्या पत्रकाराने विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या स्वाधिन करून त्यांना शाळेत परत पाठविले.

पत्रकाराच्या जागरूकतेने विद्यार्थी सुखरूप शाळेत पोहचले असले तरीही निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी पहाटे अंधारात शाळेतून पसार होतात, आणि साखरझोपेत असलेल्या शाळेतील कोणत्याही कर्मचाऱ्याला ह्याची कल्पना नसते हे भयावह असुन ह्यामुळे शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांची किती काळजी आहे हे स्पष्ट होते.

विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन निवासी आश्रमशाळेतुन पळ काढावा लागतो ह्याचा अर्थ विद्यार्थ्यांना शाळेत असलेला त्रास असह्य झाला असेल हे निश्चित. त्या विद्यार्थ्यांचे प्रवासादरम्यान काही बरेवाईट झाले असते तर? त्यांचे अपहरण झाले असते तर? किंवा इतर काही अप्रिय घटना घडली असती तर? ह्याचा विचार शाळा प्रशासनासह शिक्षण विभाग व सरकारने करणे गरजेचे असून अशा बेजबाबदार शाळेवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना का पळून जावे लागले? काय आहे त्यांच्या समस्या व कुठली आहे ही घटना? कुठे असतात ह्यांचे आईवडील? याबाबतची संपूर्ण माहिती पुढील भागात…..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये