ताज्या घडामोडी

तालुक्यात ठिकठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपन्न

कोरपणा येथे अण्णाभाऊ साठे चौकांचे अनावरण

चांदा ब्लास्ट:प्रमोद गिरडकर प्रतिनिधी.

– कोरपना येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विजय बावणे यांच्या सहकार्याने व वाढदिवसानिमित्त कोरपणा येथील मुख्य आठवडी चौकाला नगरपंचायत च्या पुढाकाराने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आले तसेच त्यांच्या स्वतःच्या लेआउट मधील तीन हजार चौरस फुट जागा ही अण्णाभाऊ साठे स्मारकास भेट देण्यात आली. यावेळी जिवती व कोरपणा तालुक्याच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी ध्वजारोहण नगराध्यक्ष सौ बावने यांच्या हस्ते करण्यात आले तर चौक नाम फलकाचे अनावरण जी एस कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित विजय बावणे,रणदिवे माजी सभापती तसेच उपनगराध्यक्ष नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते. जिवती तालुक्यात कुंभेझरी येथे लहु गोतावळे उपसरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावातील असंख्य महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात प्राचार्य पाचभाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. वणी येथे सरपंच पुंडलिक गिरीमाजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी परमेश्वर कांबळे व सर्व गावकरी मंडळी व महिला उपस्थित होत्या. पळसगुडा या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी यादव भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच संपूर्ण गावकरी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.तर जिवती शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी अण्णाभाऊ साठे फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा. सुग्रीव गोतावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित फाउंडेशनचे कोषाध्यक्ष दत्ताजी तोगरे सचिव दत्ताजी गायकवाड, विजय गोतावळे,रमाकांत जंगापल्ले, व्यंकटी तोगरे, प्रा.लिंबोरे, गोविंद वाघमारे, पवण गवाले, अंगद गुंडले, बालाजी कांबळे,डॉ. दुर्गावाड, भोजू गायकवाड, मारुती भटलाडे, अशोक मोरे, रंजीत सूर्यवंशी, अजय नरहरे,सौ.अनिता गोतावळे, सौ.स्वाती नरहरे, दीपक गोतावळे,मनोज दोरे, गुंडले,मिथुन गायकवाड, गणेश घोडके,रमेश वाघमारे,लक्ष्मण गोतावळे,आंबटवार,नितेश नामवाड,गायकांबळे,जाधव, तोगरे, सूर्यवंशी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये