ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा आर्यवैश्य महिला महासभा वृक्षारोपण कार्यक्रम

अधिक मासाचे औचित्य साधून हल्दी कुंकवाचा कार्यक्रम तसेच गरजूंना धान्य वाटप

चांदा ब्लास्ट

         मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या एकसष्टीचे निमीत्य साधून चंद्रपूर जिल्हा आर्य वैश्य महासभा यांनी श्री. कन्यका मंदिर परिसरात एकसष्ट झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत केला.

         “लावूया वृक्ष दारोदारी करूया पृथ्वी मातेची सेवा खरी” या ओळीला धरून माणसांच्या कृतीमुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचे आहे यासाठी उपस्थित अध्यक्षा अदिती तातावार यांनी पटवून दिले. सचिव माधवी गुंडावार कोषाध्यक्ष सुचिता अजय मामीडवार या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर वैशाली पालारपवार, मिता माधमशेट्टीवार, अंजली दुद्दलवार प्रमुख पाहुणे कन्यका मंदिरचेचे ट्रस्टी मिलींद भाऊ कोतपल्लीवार, अजयभाऊ मामीडवार, डॉ. सतिश तातावार, प्रशांत कोलपॅकवार,  या कार्यक्रमात उपस्थित होते.

       अधिक मासाचे औचित्य साधून हल्दी कुंकवाचा कार्यक्रम झाला. तसेच गरजूंना धान्य वाटप करण्यात आले.

       प्रसिद्धी प्रमुख राजश्री झूलके ठीवार, संगीता माधमशेट्टीवार, अंजली बंडावार,  माधुरी तन्नीरवार, चंदा नालमवार, निकीता चकनलवार व बहुसंख्य भगिनीचा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये