कामगार मजुरांना बांधकाम साहित्य प्रत्येक तालुका मध्येच वाटप करा अन्यथा आंदोलन करू : मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हा प्रमुख, चंद्रपूर
सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र शासन कडून नोंदणी केलेल्या मजुरांना सुरक्षा व आवश्यक साहित्य बांधकाम साहित्य प्रत्येक तालुक्यात देण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना इशारा देण्यात आला असून, या बाबत चे निवेदन मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री म. रा. यांना देण्यात आले या बाबत सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्र शासन कडून नोंदणी केलेल्या मजुरांना सुरक्षा व आवश्यक साहित्य बांधकाम साहित्य देण्यात येते, या साहित्याचे वितरण एम आय डी सी मधून होत आहे, परंतु पोर्टल च्या ऑनलाईन सर्वर लिंक च्या तांत्रिक अडचणीमुळे मागील काही दिवस पासून बांधकाम साहित्य देणे बंद आहे, परंतु अधिकारी मार्फत अनेकदा दिवस व तारीख देऊन लिस्ट लावत असते, परंतु साहित्य मिळत नाही त्या मुळे कामगार नागरिक दोन दोन दिवस एम आय डी सी मध्ये येऊन राहत आहे.
तरी कामगारांना साहित्य मिळत नसल्याने नागरिकांची गैर सोय होत आहे, येथे पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही, अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभार मुळे कामगारांना खूप नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने येथील कर्मचारी व अधिकारी यांचे वर शासनाने तात्काळ कार्यवाही करावी, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कामगार हे एकाच ठिकाणी एम आय डी सी मध्ये साहित्य घेण्यासाठी येत आहे, परंतु साहित्य मिळत नाही म्हणून नाराजी पत्करून निराश होऊन वापस जावे लागत असल्याने त्यांचा रोजगार जातो व नाहक त्रास सहन करावा लागत असतो. त्या मुळे प्रत्येक तालुका स्तरावर बांधकाम साहित्य वाटप केल्यास कामगार मजुरांना गावातून साहित्य मिळणार व त्रास पण होणार नाही यांची अधिकाऱ्यांनी तात्काळ काळजी घेऊन दाखल घेण्यात यावी.
अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा साहाय्यक कामगार आयुक्त यांना सौ. मिनलताई आत्राम, शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी निवेदनाद्वारे दिला, या बाबतचे निवेदन मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री म.रा., व मा. जिल्हाधिकारि साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.