जयभीम बुद्ध विहार (सिंदी मेघे) येथे बुद्ध-भीम गीतगायन स्पर्धा उत्साहात संपन्न
पलक वानखेडे प्रथम तर अनुष्का भानसे आणि हरीश दिघाडे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सिंदी मेघे येथील जयभीम बुद्धविहारातील ‘जयभीम धम्मशाळे’च्या वतीने तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव, आई रमाई स्मृतीदिन आणि धम्म शाळेच्या वर्षपूर्ती निमित्ताने विविध स्पर्धांचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उत्सवाचा एक भाग म्हणून गुरुवार, दिनांक २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘खुली कराओके बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. धनंजय नाखले आणि परीक्षण मा. रवी ढोके यांनी केले.
रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेल्या या स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु. पलक वानखेडे, द्वितीय पुरस्कार अनुष्का भानसे आणि तृतीय पुरस्कार हरीश दिघाडे यांनी प्राप्त केला.
विजेत्यांना रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हे सर्व पुरस्कार स्मृतीशेष सरस्वती विनायक शेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनायकभाऊ शेंडे यांच्या वतीने देण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीकृती वानखेडे आणि समृद्धी भगत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राजेश डंभारे यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धार्थ मून, अमित डांगे, समय मून, कविश कांबळे, सार्थक मून, धम्मशील लढे, सम्राट मून, हर्षवर्धन म्हैसकर, अर्णव जगताप, विवान कांबळे, प्रयासी डंभारे, सृष्टी इंगळे, रोमिशा वाघमारे इत्यादींनी प्रयत्न केले. या स्पर्धेला प्रा. प्रशांत जिदे, डॉ. रामकृष्ण मिरगे, रमेश जोगे, प्रा. मुन्ना नाखले, किशोर ढाले, प्रकाश जिंदे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.



