ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमाता अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा – औदुंबर शिंदे पाटील

शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे जयंती समारोह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 301 वा जयंती समारोह शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचा प्रारभ दीपप्रज्वलन,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व विद्यापीठ गीत,राज्यगीताने करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक उराडे होते. प्रमुख वक्ता म्हणून इतिहास अभ्यासक चौंडी अरणगांव येथील औदुंबर शिंदे पाटील होते.अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, अधिसभा सदस्य तथा शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वरकड, तसेच अध्यासन केंद्राचे समन्वयक गुरुदास कामडी ,उपप्राचार्य डॉ. आर. आर. खैरानी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

       सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या अद्वितीय कर्तृत्वाच्या बळावर त्या लोकमाता बनल्या. सामाजिक समरसता, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित, जलसंवर्धन आणि सांस्कृतिक वारसा जतन यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. महेश्वरी साडी उद्योगाला चालना देऊन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग त्यांनी खुला केला. असे प्रमुख वक्ता औदुंबर शिंदे यांनी सागितले.

     काशी विश्वनाथासह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करून भारतीय संस्कृतीचे जतन केले. त्यांच्या तीस वर्षांच्या राज्यकारभाराला इतिहासात सुवर्णकाळ म्हणून गौरविण्यात येते.

याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित घेण्याच्या आणायला ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठातील 55 महाविद्यालय , शाळा व कनिष्ठ महाविद्यालय 3,रा.तु.म.नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व अन्य 12 स्पर्धक असमहावीर तीन शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतलेला होता. अन्य 12 स्पर्धेमध्ये असे 608 विद्यार्थी सहभागी झाले होते . स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

प्रथम क्रमांक :

मानसी श्रीनिवास गाडगे (शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर)

नागकृष्ण मुरली जक्करवार ( शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा)

रवींद्र विनोद पाटील (लोकमान्य महाविद्यालय, वरोरा)

द्वितीय क्रमांक :

अविनाश भास्कर राऊत (सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय, चंद्रपूर)

माधुरी रामदास शेडमाके (श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा)

तुषार अनिल हजारे (एमबीए व पीजीडीटी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली)

स्वरुपा बलिराम धांडे (आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वडसा)

मनीष सुरेश गुरनुले (सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर)

तृतीय क्रमांक :

सचिन पंढरी खेडेकर (महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी)

आकाश पुंडलिक निकुरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरी)

नागेश भगवान खांडेकर (शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदास कामडी यांनी केले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमाची माहिती तसेच ऑनलाईन ये प्रश्नमंजुषा स्पर्धेचे माहिती गुरुदास कामठी यांनी दिली .प्राचार्य डॉ. संभाजी वरकड यांनी अतिथींचे स्वागत व मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. गुरुदास बल्की,आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. आर. एम. खैरानी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये