ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाईपण भारी देवा चित्रपटाचे पोस्टर लावा नाहीतर मनसेपण भारी पडणार

मनसे दम देताच काही तासात लागले पोस्टर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : “बाईपण भारी देवा” मराठी चित्रपट मिराज सिनेमा येथे प्रदर्शित होऊन देखिल मीराज सिनेमा चित्रपटगृहाच्या दर्शनी भागावर कोणतीही जाहिरात अथवा पोस्टर लावून मराठी चित्रपटाचे प्रमोशन केले नाही. त्या ऐवजी इंग्रजी चित्रपटाचे पोस्टर लावलेले होते. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान देणारा प्रकार मनसे खपवून घेणार नाही. या प्रकारामुळे मराठी रसिकांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात होती. म्हणूनच चंद्रपूर मनसे शहर अध्यक्ष सचिन भोयर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मिराज सिनेमा व्यवस्थापक यांच्या कार्यालयात धडक देत पोस्टर न लावण्याबाबत जाब विचारला.

24 तासात मराठी चित्रपट “बायीपण भारी देवा” चित्रपटाचे पोस्टर दर्शनी भागावर लावून प्रमोशन करा असा अल्टिमेटम मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यवस्थापकांना दम दिल्यानंतर काही तासांमध्येच चित्रपटगृहावर मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा” चे पोस्टर लावण्यात आले. असे करून मिराज सिनेमा व्यवस्थापकाने मनसेच्या खडकट्याक आंदोलनाचा धोका टाळला.

यावेळी मनसे शहर अध्यक्ष सचिन भोयर, महीला सेना जिल्हा अध्यक्षा प्रतीमा ठाकुर, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन भोयर, महीला जिल्हा सचिव मनीषा टोकलवार, संजय फरदे, सोनू डांगे, शुभम ठाकुर, सचिन पॉल,आशीष भुसारी, मंगेश चौधरी आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये