विजेच्या धक्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू
सावली तालुक्यातील पेंढरी येथील धक्कादायक घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
स्वतःच्या मालकीच्या शेतात धानाच्या पिकास पाणी देण्यासाठी मोटरपम्प सुरु करायला गेलेल्या शेतकरी युवकाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना सावली मुख्यालयापासून १० किलोमीटर असलेल्या पेंढरी शेतशिवारात घडली.
तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवा शेतकरी रोहीत रविंद्र ढोले (वय २८ वर्ष) हे आपल्या शेतात उन्हाळी धानाचे पीक लावले आहेत त्या धान पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी शेतात गेले. मोटरपम्प सुरु करण्यासाठी स्विच ऑन करायला गेले असता त्या ठिकाणी मात्र केबल खराब असल्याने विजेचा धक्का लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मुलगा आला नाही म्हणून वडील शेतात गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
पाथरी पोलिसांनी मर्ग दाखल करून शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. रोहितच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.मृतक रोहित च्या मागे आई,वडील,पत्नी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे.



