ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सततच्या नापिकेने कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण शेतकऱ्यांच्या या आत्महत्येमुळे परिसरात सर्वत्र हळहळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

तालुक्यातील चिचोली गावातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघळकीस आली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून सततची नापिकी व यावर्षी मुसळधार पावसाने वाहून गेलेले पीक तसेच कर्जाचा डोक्यावरचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आलेल्या एका 35 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिचोली या गावात घडली. विवेक ताराचंद गेडाम वय 35 वर्ष राहणार चिचोली असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली व आई असा आप्तपरीवार आहे. सदर मृत शेतकरी हा गेल्या तीन ते चार वर्षांपासूनच्या सततच्या नापिकेने त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला. यावर्षी सुद्धा त्याने आपल्या अल्पशेतीत खरिपाचे पीक लावले मात्र या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे नैराश्य येऊन सदर शेतकऱ्याने आत्महत्या केली. पत्नी शेतात व मुले शाळेत गेले असताना आपल्या राहत्या घरीच त्याने गळफास लावून आत्महत्या केली. मुली शाळेतून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे पाठविन्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल तुलजेवार करीत आहे. तरुण शेतकऱ्यांच्या या आत्महत्येमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये