ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

चंद्रपूर जिल्ह्यातील बॉक्सिंग खेळाडूंना महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद

स्पर्धेत खेळाडूंना १ रजत व 2 कांस्य पदके प्राप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन तर्फे दि. २१ ते २६ जुलै दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत पदके पटकावली.

           यात सब-ज्युनियर मुली ५८-६१ किलो वजनगटात चैतन्या राऊत हिला रजत पदक व ५२-५५ किलो वजनगटात स्वरनिका सादू कांस्य पदक तर ज्युनियर मुली ७०-७५ किलो वजन गटात गितीका सादू हिने कांस्य पदक पटकावले. या वेळी प्रशिक्षक म्हणून पंकज शेंडे आणि लता तिवारी ( इंदुरकर ) तसेच व्यवस्थापक म्हणून पुष्पा शेट्टी यांनी काम पाहिले. पदक प्राप्त खेळाडूंना चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. राकेश तिवारी, डॉ. बी. प्रेमचंद, प्रा. संगीता बांबोडे, कार्यकारी सचिव, डॉ. अमित प्रेमचंद, विजय डोबाळे, प्रीती बोरकर, प्रा. पुर्वा खेरकर, वर्षा कोयचाळे, डॉ.दिलीप बगडे, प्रफुल पतरंगे, रोहन,अलोका विश्वास यांनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील क्रीडा भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या असुन जिल्ह्यात सर्वत्र पदक प्राप्त खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये