देऊळगाव राजा एम आय डी सी मध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या
अनिल सावजी यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा हे लघु औद्योगिक क्षेत्र असून जवळूनच समृद्धी महामार्ग जात आहे, त्यामुळे भविष्यात लघु औद्योगिक क्षेत्र हे पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र व्हावे अशी येथील उद्योजकांची मागणी आहे, या क्षेत्राचा विस्तार होणे गरजेचे आहे या ठिकाणी शासकीय व वन विभागाची जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ही जमीन ताब्यात घेतल्यास येथील औद्योगिक क्षेत्राचा विकास झपाट्याने होऊ शकतो.
सद्यस्थितीत सर्वात महत्वाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून खडकपूर्णा धरणावरून या योजनेचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी देऊळगाव राजा चिखली राष्ट्रीय महामार्गालगत 15मीटर*700 मीटर लांबीच्या सेवा रस्त्याचा पाठपुरावा करत असून 24 मार्च रोजी मा उद्योग मंत्री यांनी रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश एम आय डी सी ला दिले असून आता कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
अंतर्गत रस्त्याचे नूतनीकरण करणे, स्वागत गेट तयार करणे, एम आय डी सी बस थांबा बांधणे, औद्योगिक क्षेत्राकरिता स्वतंत्र फिडर बसविणे, नवीन दोन हायमास्ट व स्ट्रीट लाइट बसवा अशा मागणीचे निवेदन देऊळगाव राजा लघु औद्योगिक उद्योजक तथा कामगार असोसिएशन चे अध्यक्ष अनिल सावजी यांनी एम आय डी सी अकोला येथील कार्यकारी अभियंता यांच्या कडे देऊन करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती उद्योग मंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठविण्यात आल्या आहेत.


