ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जलतरण तलावामध्ये 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जलतरण तलावातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : सद्यस्थितीत उन्हाळा उच्च तापमानामुळे बहुतांश युवा मंडळी जलतरण तलावाकडे आकर्षित होतात परंतु तेथे येणाऱ्या प्रत्येकासाठी काही उपाययोजनांची मान्यता देताना करण्यात आलेली आहे परंतु त्याचे सर्रास उल्लंघन देऊळगाव राजा राजा येथेहोत असल्याचे आज गंभीर प्रत्यय आला.शहरातील खोरेश्वर महादेव मंदिर परिसरालगत असलेल्या वॉटर पार्कमध्ये आज दि. 9 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुभम भास्कर सदावर्ते (वय २२, रा. शेवली नेर, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हा नाशिक येथे कामासाठी राहत होता. तो आपल्या नातेवाईकांकडे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी देऊळगाव राजा येथे आला होता. कार्यक्रमानंतर मित्रांसोबत तो वॉटर पार्कमध्ये गेला. मात्र, मौजमजेच्या क्षणातच काळाने झडप घातली आणि पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे वॉटर पार्कच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळी योग्य लाइफगार्ड किंवा सुरक्षा व्यवस्था होती का, याबाबत संतप्त नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे

 दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.देऊळगाव राजा पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये