ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरा ग्रामपंचायतीची विद्युत वितरण कंपनी विरोधात ग्राहक पंचायतकडे तक्रार

विद्युत वितरण कंपनीने तक्रारीची दखलच घेतली नाही : विलास जिवतोडे, उपसरपंच चोरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

ग्राहक पंचायतकडे आलेल्या चोरा ग्रामपंचायतीच्या लिखीत तक्रारीनुसार उप कार्यकारी अभियंता आणि तहसिलदार भद्रावती यांचे कार्यालयास ग्राहक पंचायतने पत्र दिले.

तालुक्यातील चोरा गावातील अनेक विद्युत खांब जंगलेले आहे. त्यांना खालुन भगदाड पडले आहे. विद्युत खांबामुळे चोरा वासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शिवाय काही खांबावरील तारा लोंबकळत असल्याने ये-जा करणाऱ्या बस आणि ट्रकला स्पर्श होण्याची भिती आहे. त्यामुळे ग्रामपंचायत चोरा यांनी उप कार्यकारी अभियंता, भद्रावती यांचेकडे सहा महिने अगोदर लिखीत तक्रार दाखल केली होती. परंतु सहा महिने लोटुनही तक्रारी ची दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत उपसरपंच विलास जिवतोडे यांनी ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीन चीमूरकर यांच्याशी संपर्क करून संपूर्ण माहीती दिली. चीमूरकर यांनी विषयाची गंभीरता लक्षात घेत भद्रावतीचे उप कार्यकारी अभियंता, विजय कांबे यांच्याशी संपर्क केला आणि आज दि. २५ ला चोरा ग्रामपंचायत च्या तक्रारी वरून उप कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले. यात गावठाणातील लोखंडी जंगलेले खांब बदलने, लोंबकळत असलेल्या विद्युत तारांना तान देणे आणि ग्राम पंचायतला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला शेतातील विद्युत खांबा वरुन दिलेला विद्युत पुरवठा काढून गावठाणातील खांबावरुन देण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख करून तात्काळ कारवाई करावी. अन्यथा विद्युत खांबामुळे अथवा तारांमुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास यांची संपूर्ण जिम्मेदारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, भद्रावती ची राहील असे ठणकावून सांगितले.

यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक वसंत वऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण चीमूरकर, तालुका अध्यक्ष वामन नामपल्लीवार, कोषाध्यक्ष सुदर्शन तनगुलवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खांब बदलविण्याचे काम खाजगी कंत्राटदाराकडे दिलेले आहे. खाजगी कंत्राटदाराला त्वरीत दुरध्वनी व्दारे संपर्क करून तात्काळ काम सूरू करण्याचे सांगितले.
विजय कांबे – उप कार्यकारी अभियंता, भद्रावती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये