नेपाळ सारखे शासनकर्त्याच्या घरात घुसू – बच्चु कडु
शेतकरी शेतमजुर हक्कयात्रेत प्रतिपादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
तालुक्यातील पाथरी येथे शेतकरी, शेतमजुर दिव्यांग यांच्या हक्कासाठी जाहिर सभेचे (दि. 23) रोजी माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चु कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव न दिल्यास नेपाळ सारखे शासनकर्त्यांच्या घरात घुसू असा गंभीर इशारा याप्रसंगी बच्चु कडु यांनी सरकारला दिला.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने 15 टक्के नफ्याने 4 हजार 783 रुपये धानाला भाव देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली मात्र केंद्रसरकारने 2 हजार 369 रुपये एवढाच भ्राव जाहिर केला त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापासुन वंचित राहण्याची वेळ आली आहे. या देशात ना हिंदु खतरे मे है, ना मुसलमान, खतरमे है तो मेरा किसान है असे व्यक्तव्य त्यांनी केले. शेतकरी जर जागा झाला तर सरकारला जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारने हमीभाव जाहिर करावा, अन्यथा आम्ही रस्या तवर उतरुन राज्यभर आंदोलने करु असा गंभीर ईशारा बच्चु कडू यांनी सरकारला दिला. सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी अत्यल्प प्रावधान केले जाते आणि मोठ मोठया उद्योजकासाठी सवलत दिल्या जाते ही बाब शेतकऱ्यांच्या हितार्थ नाही. दिव्यांगाना 6 हजार प्रतीमाह मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन केले.
या सभेत दिव्यांगाना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील असोला चक येथील पुनर्वसित नागरीकांचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम आता प्रहार संघटना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर, पाथरीच्या सरपंच अनिता ठाकरे, जिल्हाउपाध्यक्ष प्रफुल तुम्मे आदि मान्यवर उपस्थित होते.