ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तिरळे कुणबी समाजाचा १६ फेब्रुवारी ला विदर्भस्तरीय वधु-वर परिचय मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती येथील तिरळे कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने रविवार दि. १६ फेब्रुवारीला श्रीमंगल कार्यालय येथे विदर्भस्तरीय भव्य वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

  या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा परिषद यवतमाळचे माजी अध्यक्ष अशोक घारफळकर त्यांचे शुभ हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तिरळे कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र वैद्य स्वागताध्ष्यात रविंद्र शिंदे व प्रमुख वक्ते,मार्गदर्शक प्रबंधनकार प्रविण देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीन सदर सोहळा संपन्न होत आहे.

सामाजिक बांधीलकी व वचनबद्ध‌ता ह्या उद्दात हेतूने सदर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपवर मला-मुलींसह या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक दत्ता कोंबे,मोहन पवार,अमोल दौलतकर,वसंता मानकर, कृणा इंगले,प्रशांत इंगळे,अमोल दौलतकर, छत्रपती राऊत,अमोल गावंडे,शंकर मिरे,रवी देऊळकर,प्रवीण ठाकरे,विजय भोयर,प्रशांत तूरानकर,प्रणय पवार आदींनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये