चंदनखेडा येथे तालुकास्तरीय श्रीगुरुदेव कार्यकर्ता मेळावा संपन्न
हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत श्रीगुरुदेव भद्रावती तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा चंदनखेडा येथे शेकडो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या तत्त्वज्ञान, साहित्य व कार्याचा प्रचार व्हावा या हेतूने भद्रावती तालुकास्तरीय मेळावा चंदनखेडा येथे रविवारला संपन्न झाला. कार्यकर्ता मेळाव्याची सुरुवात प्रातःकाळी श्रीगुरुदेव अधिष्ठानाचे पूजन व सामुदायिक ध्यानाने झाली. त्यानंतर चंदनखेडा परिसरात रामधून काढण्यात आली. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी प्रा.अशोकजी चरडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सत्राची सुरुवात झाली. उदघाटक म्हणून हभप केशवानंद मेश्राम महाराज, मधुकरजी बांदुरकर, डाॅ. शरदजी उरकांडे उपस्थित होते.
यामध्ये ह.भ.प. मनोज महाराज चौबे, प्रचार प्रमुख प्रा. रुपलाल कावळे, तालुका सचिव गजानन डंभारे, महिला जिल्हासेवाधिकारी सुवर्णा पिंपळकर, जिल्हा सहसचिव शुभांगी कुत्तरमारे, जिल्हा कोषाध्यक्ष सोनाली गावंडे, मनिषा डांगरे, मिनल चौधरी, चंद्रकला मत्ते यांचे मार्गदर्शन लाभले. यानंतर द्वितीय सत्र अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम चे सर्वाधिकारी ह.भ.प.प्रकाश महाराज वाघ यांचे अध्यक्षतेखाली झाले यामध्ये दामोदरजी पाटील, प्रचार प्रमुख गोपाल कडू,अध्यात्म गुरुकुल मोझरी चे संचालक रवी मानव, जिल्हा युवक प्रमुख गुणवंत कुत्तरमारे, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा तालुका अध्यक्ष विशाल गावंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर तालुका कोषाध्यक्ष योगेश्वर कुरेकार तसेच श्रीगुरुदेव प्रचारक बाबाजी दोहतरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भारती उरकांडे तसेच राजु मांडवकर सर यांनी केले तर आभार चंद्रशेखर भिवदरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्रीगुरुदेव तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजन समितीचे गुलाब भोयर, डॉ शरद उरकांडे, विनोद हनवते, दिलीप टोंगे, गुलाब भडके, श्रीराम सोनुले, महादेव बल्की, टीकाराम येवले,रामकृष्ण गाडगे, चंद्रभान चौधरी, योगिता बोढे, मनीषा ठावरी तसेच भद्रावती तालुक्यातील सर्व गुरुदेव सेवकांनी, उपासकांनी परिश्रम घेतले.



