भद्रावतीत ‘ईद मिलन समारोह’चे आयोजन : सौहार्द व बंधुत्वाचा संदेश

चांदा ब्लास्ट
शहरात सामाजिक एकात्मता आणि आपसी सौहार्द वाढविण्याच्या उद्देशाने ‘ईद मिलन समारोह’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सर्व धर्म व समाजातील नागरिकांना एकत्र आणून बंधुत्व आणि शांततेचा संदेश दिला जाणार आहे.
जामा मस्जिद कमिटी, भद्रावती यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी शहरातील सर्वधर्मीय नागरिक, मान्यवर व्यक्ती तसेच पत्रकार बांधवांना सादर आमंत्रित करण्यात आले आहे. ईदच्या पावन निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
सदर ‘ईद मिलन समारोह’ बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ८.०० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे स्थळ डॉ. जे. के. पेटलेस, मानोरा रोड, भद्रावती असे निश्चित करण्यात आले आहे.
कार्यक्रमादरम्यान सेवईसह अल्पोपहाराची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, सर्व नागरिकांनी उपस्थित राहून सामाजिक समरसता अधिक बळकट करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


