ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आई-वडिलांच्या स्मृती प्रितर्थ कोरपणा नगरीत भागवत कथा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

नंदविजय काॅटन प्रा. लि. सोनुर्ली तालुका कोरपना यांच्या सौजन्याने हनुमान मंदिर / दुर्गा माता मंदिर समोरील पटांगण, कोरपना येथे भागवताचार्य बालयोगी श्री. स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते पार पडले.

        या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधरराव गोडे, जि. प. चे माजी सभापती अरुण निमजे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, नगराध्यक्षा नंदाताई बावणे, कृ. उ. बा. स. सभापती अशोकराव बावणे, नगरसेवक नितीन बावणे, प. स. चे माजी सभापती नोगराजजी मंगरुळकर, वंदनाताई बतकी, गजानन खामनकर, श्यामभाऊ रणदिवे, सुरेश पाटील मालेकर, सितारामजी कोडापे, पुंडलिक गिरसावळे, संभाजी कोवे, बालाजी पुरी, भारत चन्ने, भाऊजी चव्हाण, भाऊराव कारेकर यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगीचे क्षणचित्रे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये