भद्रावती येथे पुरुष व महिलांचे भव्य खुले कबड्डी सामने
दिनांक ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा परिषद हायस्कूल, भद्रावती येथे स्पर्धा रंगणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गितेश वसंतराव सातपुते यांच्या सौजन्याने न्यु साई राजे क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ भद्रावती यांचे आयोजन
स्व. वसंतराव सातपुते व स्व. रितेश सातपुते यांचे स्मृती प्रित्यर्थ गितेश वसंतराव सातपुते यांच्या सौजन्याने न्यु साई राजे क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ भद्रावती द्वारा पुरुष व महिलांचे भव्य खुले कबड्डी सामने स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या खुले कबड्डी सामन्यात अ गट (अमर्यादित), ब गट (५५ किलो) व क गट (महिला) अशा तीन विभागात स्पर्धा पार पडणार आहेत. ‘अ’ गटात प्रथम बक्षीस ४१०००, द्वितीय बक्षीस ३१०००, तृतीय बक्षीस २१०००, ‘ब’ गटात प्रथम बक्षीस ३००००, द्वितीय बक्षीस २००००, तृतीय बक्षीस १००००, ‘क’ गटात प्रथम बक्षीस ११०००, द्वितीय बक्षीस ७०००, तृतीय बक्षीस ५००० आहे.
पुरुष व महिलांचे भव्य खुले कबड्डी सामन्यांचे उद्घाटन सत्राला केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, आमदार संजय देरकर, प्रमुख उपस्थिती तहसीलदार राजेश भांडारकर, ठाणेदार अमोल काचोरे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, जिल्हा क्रीडा अधिकारी जयश्री देरकर, गट शिक्षण अधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे, जिल्हा परिषद हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. भारती गावंडे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, नेत्ररोग तज्ञ डॉ. चेतन कुटेमाटे, आदी उपस्थित असणार आहेत.
तर बक्षीस वितरण सत्राला प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली, शिवसेना (शिंदे गट) महिला जिल्हा प्रमुख सौ. मिनल आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख, भाजपा जिल्हा सचिव ऍड. सुनील नामोजवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने, डॉ. वैभव शिंदे, आदिवासी नेते रमेश मेश्राम, यंग चांदा ब्रिगेड चे जिल्हा प्रमुख जितेश कुळमेथे, प्रसिध्द विधीज्ञ भूपेंद्र रायपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता सतीश वरखडे, माजी खेळाडू सूरज ठाकरे, नंदोरीचे सरपंच मंगेश भोयर, हेमंत आवारी, अमोल पोटे, भूषण बोढाले, किसन पत्तीवर, पत्रकार सचिन सरपटवार, पी.जे. टोंगे, आदी उपस्थित राहणार आहेत.
या सर्व सामन्यांचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहर अध्यक्ष गितेश सातपुते, न्यु साई राजे क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळा अध्यक्ष गोलू गेडाम, सचिव योगेश काकडे, कोषाध्यक्ष दीपक निकुरे आहेत.