ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा स्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बेंड द बार जीमच्या स्पर्धकांची दमदार कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       ए. एस फिटनेस तर्फे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भद्रावती येथील ग्रामोदय संघ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांतून स्पर्धकांनी सहभाग घेतला.

भद्रावती येथील बेंड द बार फिटनेस जिमच्या खेळाडूंनीही दमदार कामगिरी बजावली. 59किलोग्राम वजन गटात यश वाघमारे याने दितीय क्रमांक मिळविला, तर मुलींच्या गटा मध्ये 57 किलो वजन गटात झारणा बेहरा द्वितीय क्रमांक तसेच 63किलो वजन गटात पायल नांगरे हीने प्रथम पटकवीला.

या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. बेंड द बार जिमचे संचालक अरविंद वाघमारे व अनुप वाघमारे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच कोच व गुणवंत क्रीडा पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र स्ट्रॉंग मॅन पुरस्कार प्राप्त अमोल आवळे यांनीही शुभेच्छा दिल्या. जिममधील सर्व सदस्यांनीही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये