ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषि उत्पन्न बाजार समिती, भद्रावती तर्फे कापूस खरेदीला सुरूवात

पहिल्याच दिवशी 607 क्विंटल कापसाची खरेदी

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील उपबाजार आवार, मुर्सा येथील मे. गौरीनाथ ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि., मुर्सा येथे गुरूवार दि. 07/11/2024 रोजी बाजार समितीचे सभापती श्री भास्कर लटारी ताजणे यांच्या शुभ हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 607 क्वि. कापसाची खरेदी करण्यात आली.

 याप्रसंगी बाजार समितीचे संचालक श्री परमेश्वर ताजणे, विनोद घुगुल, राजेंद्र डोंगे, तसेच बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह अडते बाबा चौधरी, महेश गोडे व मुर्सा येथील स्थानिक शेतकरी मारोती नवले तसेच मे. गौरीनाथ ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि., मुर्सा चे संचालक सागर हरियाणी, कात्यायनी हरियाणी, अशोक हरियाणी, भारती हरियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आलेले शेतकरी रामदास नामदेव डोंगरकर, बेलसणी, विलास आत्माराम डुडुरे, मुर्सा, सय्यद जरार हुसेन, चिनुर, पी. श्रीनिवास, कागजनगर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी संजय शेंडे, प्रविण राहुलगडे, मुकुंदा ठेंगणे, रोहित शेडामे तसेच मापारी गणेश नागोसे यांनी सहकार्य केले.

*शेतमाल विक्रीस आणण्याचे आवाहन*

 चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपआपला कापूस भद्रावती तालुक्यातील उपबाजार आवार, मुर्सा येथील मे. गौरीनाथ ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि., मुर्सा येथे विक्रीस आणावा, असे संयुक्त आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे सभापती भास्कर ल. ताजणे, उपसभापती सौ. अश्लेषा मं. भोयर (जिवतोडे) आणि सचिव नागेश पुनवटकर व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये