ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथे शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : फिमेल एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभागाव्दारा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. मिनाक्षी ठोंबरे यानी प्रथमता डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पित करुण अभिवादन केले. प्राचार्य डॉ. मिनाक्षी ठोंबरे शिक्षक दिन या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती देऊन पुर्ण वेळ शिक्षकाच्या भर्ती व तासिका तत्वावर असलेल्या शिक्षकाच्या अवस्थेबाबत खंत व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक रासेयो सह कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रज्ञा जुनघरे तर आभार प्रा. डॉ. राजेंद्र बारसागडे रासेयो कार्यक्रम अधिकारी यानी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता बंडु वरवाडे, रमेश गुरनुले यानी विशेष सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये