ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर शहरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त केव्हा करणार?

नागरिक हैराण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नुकतंच नगरपरिषदेने शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याविषयी सूचनावजा दवंडी दिली गेली होती परंतु पुढे त्याचं काय झालं, आणि विशेषरूपाने त्यावर काही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
त्यामुळे शहरात व बाजारपेठेत या मोकाट जनावरांचा नाहक त्रास वाढलेला आहे.

यांच्यामुळे रहदारी व वर्दळीला त्रास होत आहे. सततच्या पावसामुळे घाणीच्या साम्राज्यात वाढ होत आहे.

शिवाय बाजारपेठेत भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे..घेतलेला भाजीपाला दुचाकीवर ठेवला आणि थोडी जरी नजरचुकी झाली तरी त्यावर यथेच्छ ताव मारत असल्याने आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्यांना याचा फटका बसत आहे.

यावर नगर परिषद ने तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची गरज असल्याची नागरिकांत मागणी होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये