ताज्या घडामोडी

रेती माफीया विरूध्‍द धडक कारवाई

एकूण ३३ लाख १५ हजाराचा मु्द्येमाल जप्‍त

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         पोलीस स्‍टेशन देवळी हद्दीत मौजा. सोनेगांव बाई शिवारात यशोदा नदी पात्रातुन अवैद्यरित्‍या रेती उपसा करून वाहतुक करीत असल्‍याचे गोपनिय माहीती च्‍या आधारे पथकातील पोउपनि प्रेमराज अवचट सोबत सफौ/११९३ सुभाष गावड, सफौ/१११६ दिपक जाधव, पोशि/६३५ संदीप बोरबन, पोशि/१४६४ रामदास दराडे, पोशि/१८० उमेश बेले, पोशि/१७८८ शुभम कावळे यांचेसह छापा टाकुन ०२ अरोपी विरूध्‍द कायदेशीर कार्यवाही करून १८,१०,०००/- रूपये चा मुद्येमाल जप्‍त करण्‍यात आला. तसेच पोलीस स्‍टेशन पुलगांंव हद्दीतील मौजा. तांभा शिवारात वर्धा नदी चे पात्रातुन अवैद्यरित्‍या रेती उपसा करून वाहतुक करीत असतांना ०४ अरोपी विरूध्‍द कायदेशीर कार्यवाही करून १५,०५,०००/- रूपये चा मुद्येमाल जप्‍त करण्‍यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये