ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केपीसीएल कंपनीच्या आश्वासनानंतर विकलांगाचे आंदोलन मागे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             बरांज येथील विकलांग देवानंद पुरवटकर याला कंपनी नोकरी द्यावी तसेच शेतीचा आर्थिक मोबदला द्यावा या मागणीसाठी त्याचा भाऊ संतोष पुनवटकर हा आपल्या विकलांग भाऊ याला घेऊन गेल्या १७ दिवसापासून केपीसीएल कंपनीच्या विरोधात आंदोलन करीत होता अखेर कंपनीने आर्थिक मोबदला अ स्थाई नोकरी देण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

केपीसीएल कंपनीने आपल्या मागणी मान्य करावा यासाठी विकलांग देवानंद यांनी कंपनीची चार तास कोळसा वाहतूक शुक्रवारला थांबविली होती. या विकलांगाची शेती कंपनीने संपादित करून त्याला केवळ तीन एकरात तीन लाख मोबदला दिला. तसेच कंपनीने नोकरीत सामावून घेतले नाही.

त्यामुळे हा विकलांग पुढील जीवन कसे जगणार यासाठी त्याचा भाऊ संतोष पुनवटकर आपला विकलांग भाऊ देवानंद याला घेऊन गेल्या १७ दिवसापासून बरांज खुल्या कोळसा खाणीत आंदोलन करीत होता अखेर आज दिनांक १८ ला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर ठाणेदार बिपिन इंगळे, विनोद खोब्रागडे यांच्या मध्यस्थीने नींबू पाणी देऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये