Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

आदर्श हिंदी प्राथमिक विद्यामंदिर येथे आनंद मेला संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 गडचांदूर येथील आदर्श हिंदी विद्यालयात कक्षा दुसरीचा दिव्यांग विद्यार्थी देवकुमार झुमुक जेठूमल च्या हस्ते आनंद मेळ्याचे उद्घाटन 30 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मंजुषा मत्ते होत्या व प्रमुख अतिथी म्हणूनमाता पालक संघाचे पदाधिकारी, विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आनंद मेला मध्ये भारतातील प्रत्येक राज्याची ओळख असणारे खाद्य पदार्थ ची एकूण 27 दुकाने लावली होती यात वर्ग दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थी व विद्यार्थिनींनी 7835 रुपये विक्री करून कमाविले. सदर आनंद मेल्याचा लाभ गडचंदुर येथील भंडारा कॉलनी ,लोडर कॉलनी, बंगाली कॅम्प, ढुमणेलेआउट, येथील जनतेने घेतला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या विद्यार्थी मंत्रिमंडळाने केले.

कमवा व शिका या मंत्राचा आधार घेऊन जीवनात पुढे नक्की यशस्वी वाटचाल कराल असा आशावाद आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर मंजुषा मते मॅडम यांनी व्यक्त केला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याबद्दल सर्व पालकांची सुद्धा त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन श्री अनंत काळे यांनी केले, प्रास्ताविक श्री पुरुषोत्तम निब्रड यांनी केले. श्री पुरुषोत्तम बोरकर यांनी आभार मानले. सर्व परिसर स्वच्छ करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये