ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बेलदार समाज बल्लारपूर तर्फे नगराध्यक्षांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बेलदार समाजसेवा कल्याण समिती बल्लारपूर तर्फे बालाजी सभागृह येथे स्नेह मिलन कार्यक्रमात बल्लारपूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. अलकाताई अनिल वाढई व स्वीकृत सदस्य डॉ.श्री सुनील जी कुलदीवार व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ.श्री अनिल वाढई यांचा समितीच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.निर्मलाताई पुलगमवार, सत्कार मूर्ती सौ. अल्काताई अनिल वाढई, प्रमुख अतिथी सौ. बेबीताई दिकोंडवार सौ .सुवर्णा नायडू, जेष्ठ वक्त्या प्राध्यापिका सविताताई बोपनवार, सचिव सौ. रेखाताई बेझलवार सौ. छाया नंदिग्रामवार, सौ संगीता ताई गांडलेवार ,सौ. मीनाक्षीताई झिलकरवार आदींची मंचावर उपस्थिती होती

मान्यवरा तर्फे बेलदार समाजाचे प्रेरणास्थान माजी मुख्यमंत्री स्व.श्री. मा सां. कन्नमवार यांच्या प्रतिमेस पुष्प माला्रपण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .यानंतर समितीतर्फे समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे डॉ. सुनील जी कुल्दीवार यांनी सत्काराला उत्तर देताना *बेलदार समाज हाअल्पसंख्यांक समाज आहे व त्यांना नगर परिषदेकडून असलेली अपेक्षा*यावर मार्गदर्शन केले समितीतर्फे सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा सौ.अलकाताई अनिल वाढई यांनी बल्लारपूरच्या विकासात सर्व समाजाचे योगदान राहील* यावर मार्गदर्शन केले ज्येष्ठ वक्त्या सविताताई बोपनवार यांनी *बेलदार समाज संघटन व मेळाव्याद्वारे समाजाची जागरूकता व प्रगती *यावर भाष्य केले.

सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स स्पर्धा ,वन मिनिट शो ,कपल गेम द्वारे उपस्थितांचे मनोरंजन व हळदी कुंकू व वान वाटप करून स्नेह मिलन करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. समितीतर्फे स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आणी श्री श्रीनिवास तोटा यान्च्या सौजण्याने बालाजी मगंल कार्यालय समाजासाठी उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.ईश्वर नेरळवार,संचालन सौ.राणी गादेवार व आभार प्रदर्शन श्री. सुनील बोपनवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता समितीचे पदाधिकारी अध्यक्ष श्री. श्रीनिवास बुग्गावार, कार्याध्यक्ष श्री. श्रीनिवास तोटा, उपाध्यक्ष उमेश कोलावार, सचिव श्री.सुनील बोपनवार, सहसचिव विलास बेझलवार सदस्य सर्वश्री.रमेश उद्धरवार अडव्होकेट कीशोर पुसलवार गणेश तोटेवार, पवन बोपनवार, शंकरराव पुलगमवार,नागेश्वर गंडलेवार,रवी पुपलवार, गणेश जीलकरवार,अमोल दिकोंडवार, राकेश अडगूळवार, साईनाथ झीलकरवार,राजेश मारशेट्टीवार राजू गादेवार, मलेश गडीलवार, राजम कोंडावार, रमेश नायडू, साईनाथ गाजरेडिवार,संकेत उध्दरवार ,नागेश नायडू ,संकेत नायडू, डॉ. आशिष गुज्जनवार, शंकर झीलकरवार, कैलास झिलकरवार, चंदन झीलकरवार अशोक नायडू,रमेश नायडु रवी कोलावार, दिनेश कोलावार व महिला समितीच्या अश्विनीताई बुगावार,मनीषा कोलावार, जय लक्ष्मी झिलकारवार, रेखाताई गादेवार, ज्योती तोटेवार, शिल्पा नायडू, रजनी झिलकरवार, शितल झिलकरवार,सुनिता नायडू,श्रीलता पुसलवार, दीपावली दिकोंडवार, अनिता कोलावार, नंदा गांडलेवार, श्री लता पुपलवार, भारती मारशेट्टीवार वदंना झीलकरवार शीतल झिलकरवार,संध्या नेरळवार, अनिता अनमुलवार,अमृता अडगुळवार,कवीता बोपनवार. प्रचेता बोपनवार हेमलता कोमटवार उमा नायडु ममता पबतवार,सुजाता गडीलवार, शितल कोलावार, सुधा जीलकरवार, मीनल झिलकरवार ,हर्षु मोदीनवार अक्षदा गुजनवार हेमा देशवेणी,सपना मिरदोडीवार व असंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये