ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जायंटस सहेली तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरातील विविध शाळांमधून 185 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जायंटस वेल्फेअर फाउंडेशन द्वारा संचलित जायंट्स ग्रुप ऑफ देऊळगाव राजा व जायंट्स सहेली ग्रुपच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा हा दृष्टिकोन समोर ठेवून दिनांक 25 जानेवारी 26 रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मध्ये करण्यात आलेले होते या स्पर्धेसाठी शहरातील विविध शाळातील वर्ग पाच ते दहा मध्ये शिक्षण घेत असलेल्या 185 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला बालकलाकारांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा छोटासा प्रयोग यशस्वी झाल्याचे सहेली ग्रूप च्या अध्यक्ष किरण आंबुसकर व सचिव लता हरकुट यांनी सांगितले.

 याबाबत सविस्तर असे की शालेय शिक्षण घेणाऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे गुण दडलेले असतात मात्र अनेकांना योग्य वेळी योग्य असे व्यासपीठ उपलब्ध झाली नाही तर त्यांच्या अंगी असलेल्या कलेचे ते प्रदर्शन करू शकत नाही ही बाब हेरून जायंटस ग्रुप ऑफ देऊळगाव राजा व जायंटस सहेली ग्रुपच्या सदस्यांनी एकत्रित येत इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून अ गट व ब गट अशा विद्यार्थ्यांची विभागणी करून चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक 25 जानेवारी 26 रोजी करण्यात आले होते वर्ग पाच ते सातच्या विद्यार्थ्यांसाठी *पर्यावरण सुरक्षा* व आठ ते दहा च्या विद्यार्थ्यांसाठी वन्यजीवन चित्रकला चे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत दोन्ही गटातून 185 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामध्ये अ गटातून प्रथम सहकार विद्या मंदिर ची विद्यार्थिनी पल्लवी श्रीपात्री सरडे सर द्वितीय क्रमांक देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगावराजा ची जान्हवी गोपाल लोहिया या तर प्रोत्साहन पर सहकारी विद्या मंदिराची रेणुका तुषार क्षीरसागर व ब गटातून प्रथम शिवाजी हायस्कूलचा आर्या सदानंद झिंजे द्वितीय देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा ची निकिता बळीराम न्याहाळ प्रोत्सांहन पर राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल ची खुशी भरत नागरे यांना बक्षिसे जाहीर करण्यात आली परीक्षक म्हणून कमलाकर जायभाये ,सदानंद झिंजे व शिवकुमार खांडेभराड यांनी काम पाहिले तर चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रूप च्या अध्यक्ष किरण आंबुस्कर ,लता हरकुट, राखी कबरा, अनुराधा सराफ, पारस छाजेड, कल्याणी कायस्थ, मालती कायंदे, जया जैन, निर्मला सराफ ,विजया बाहेती, जयश्री चांडगे, मालती सराफ, मीनाक्षी पारिक, राधिका व्यास, सविता पाटील, रेणुका गुजर, अर्चना कायस्थ, शकुन गुप्ता, सुषमा गुप्ता, पूजा जयस्वाल यांनी अथक परिश्रम घेतले.

व या स्पर्धेत सहभागी सर्व विध्यार्थी व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देन्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये