श्री मयुरेश्वर त्रिदिवसीय दिवसीय गणेश जयंती सोहळ्याची सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री मयुरेश्वर गणपती मंदिर येथे श्री गणेश जयंती निमित्त त्रिदिवसीय गणेश जयंती सोहळा तथा गणेश याग व किर्तन सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला महाप्रसाधने उत्सवाची सांगता झाली.
शहरातील पुरातन असे श्री मयुरेश्वर गणपती मंदिर येथे श्री मयुरेश्वर मित्र मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त दिनांक 21 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्या मध्ये ध्वजपूजन मंडप पच्छादन गणपती सहस्र आवर्तन व अभिषेक तथा गणेश याप महाआरती हरिपाठ व हरिकीर्तन अशा विविध कार्यक्रम तीन दिवसांमध्ये संपन्न झाले.
ह भ प संजय महाराज गायकवाड व ह भ प कार्तिक महाराज घाडगे यांचे दोन दिवस कीर्तन तसेच काल्याचे किर्तन ह भ प संत चरणदास निकम महाराज यांचे झाले .मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रोहिदास बोराटे यांनी संपत्ती महाआरती केली.हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या सोहळ्यास आमदार मनोज कायंदे,माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष माधुरीताई शिंपणे उपाध्यक्ष वनिताताई भुतडा ,गटनेते प्रदीप वाघ माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड व गोविंदराव झोरे व नगरसेवक तथा आजी-माजी लोकप्रतिनिधी देऊळगाव राजा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती.या उत्सवात वारकरी टाळकरी भजनी मंडळ व गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
श्री मयुरेश्वर गणेश जयंती सोहळा यशस्वीतेसाठी मयुरेश्वर मित्र मंडळ व महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले



