प्रजासत्ताक दिन आणि सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री प्रभू रामचंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,शिव वैभव इंग्लिश मीडियम स्कूल नांदा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ. सुनिताताई विरेंद्र लोढिया, प्राचार्य श्री.अनिलराव मुसळे, श्री संजय राव मुसळे, श्री. साईदास रोगे, प्रेमनाथ जी पानघाटे,किसनराव गोंडे, मनोहर झाडे, सौ. चांदनी लोढिया श्री.कार्तिकजी मालेकर, गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सौ.सुनिता ताई लोढीया यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या संगीत कवायती घेण्यात आल्या.
सदर कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.सुनीताताई लोढीया यांनी विद्यार्थ्यांना संविधान वाचनातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आपल्याला कळेल. त्याचप्रमाणे माणसाने माणसाशी मानवतेने वर्तन करावे ही संविधानाची शिकवण आहे असे मार्गदर्शन केले. प्राचार्य श्री अनिल मुसळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी एकल व समूह नृत्य सादर केले . खेळामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम रोगे, प्रा. सौ. स्मिता देवतळे तर आभार प्रदर्शन प्रवीण कुळसंगे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



