व्हिडीओ वादातून बारवर चाकू घेऊन धमकी
भद्रावतीत तिघांविरोधात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कोहिनूर बिर्याणी दुकानातील अन्नात किडा आढळल्याचा व्हिडीओ काढल्याच्या वादातून तिघांनी शहा बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये घुसून चाकू दाखवत धमकी दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी बार चालक गोपालचंद्र शहा (वय ६२) यांच्या तक्रारीवरून कोहिनूर बिर्याणीचे दुकानदार जुनेद शेख व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३३३ व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकार सुरज शहा यांनी व्हिडीओ व्दारे व्हायरल करून या कृत्या बाबत जानीव करून दिली होती याचाच वचपा काढण्यासाठी सुरज शहा यांना चाकूने मारहान करण्यासाठी हा प्रकार घडला मात्र ते दुकानात अनुपस्थित असल्याने हा प्रकार टळला.
आरोपी मोटारसायकलवर येऊन बारमध्ये चाकू दाखवत शिवीगाळ व धमकी देऊन पळून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत



