लखमापूर येथे बीटस्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर (बीट नांदगाव सूर्या) येथे दिनांक 21 ते 23 जानेवारी 2026 पावेतो तीन दिवशीय महोत्सवाचा भव्य सोहळा
लखमापूर येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानावर बीटस्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025-26 उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन श्रीकांत बोबडे साहेब, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती कोरपणा यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षपदाची जबाबदारी गावचे सरपंच अरुण भाऊ जुमनाके यांनी निभावली. विशेष अतिथी म्हणून सन्माननीय कल्याणजी जोगदंड गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपणा उपस्थित होते. तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर भाऊ जोगी, पोलीस पाटील संदीपजी तोडासे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी पिंपळशेंडे, उपसरपंच संभाजी टेकाम, शाळेच्या उपाध्यक्षा अश्विनीताई बुऱ्हाण, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष अमित आवारी, गावातील ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळ, युवक मंडळ, भजन मंडळ व विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीने सोहळा अधिकच भव्य झाला.
सदर स्पर्धा शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री विनोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बालकिडा स्पर्धा पार पडल्या.
विशेष मार्गदर्शन नांदगाव सूर्य बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील कोहपरे यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय बाल क्रीडा यशस्वी रित्या पार पडल्या.
सदर क्रीडा स्पर्धा मध्ये
बीटातील 23 शाळांनी सहभाग घेतला.
– प्राथमिक गट मैदानी चॅम्पियन: बाखर्डी शाळा
– माध्यमिक गट मैदानी चॅम्पियन: लखमापूर यजमान शाळा
विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खो, लांब उडी, उंच उडी,थाळी फेक गोळा फेक रिले रेस १००मी,२००मीटर धावण्याच्या शर्यतीसह विविध खेळांमध्ये आपली ताकद दाखवली.
सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नक्कल, फॅन्सी ड्रेस स्पर्धा यांसारख्या कार्यक्रमांद्वारे आपली कला सादर केली.
– सांस्कृतिक स्पर्धा चॅम्पियन : भारोसा शाळा
देशभक्ती, सामाजिक संदेश आणि ग्रामीण संस्कृती यांचा संगम या कार्यक्रमांतून दिसून आला.
जनरल चॅम्पियन
सर्व सांघिक, मैदानी व सांस्कृतिक स्पर्धांचा विचार करता या तीन दिवशीय महोत्सवाचा जनरल चॅम्पियन आयोजक शाळा – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर ठरली.
या महोत्सवाने विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला, सांस्कृतिक अभिव्यक्तीला आणि सामाजिक एकतेला नवी दिशा दिली. गावातील सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.



