शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी ‘रस्ता सुरक्षा अभियान’चे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी : शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी संस्थेत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ चे आयोजन संस्थेचे प्राचार्य डॉ. राजन वानखडे यांच्या मार्गदर्शनात नुकतेच करण्यात आले.
यावेळी श्री. नरेंद्र उमाळे, सहायक मोटर वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर यांनी रस्ता सुरक्षा कशा प्रकारे करावी याकरिता सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना दुचाकी चालवतांना हेल्मेट घालण्याचे महत्व समजावून सांगितले. अपघातांचे प्रमाण कमी करण्यसाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी विभागप्रमुख प्रा. नितीन डोर्लीकर यांच्यासह कर्मशाळा अधीक्षक प्रा. प्रशांत खानोरकर अधिव्याख्याता प्रा. विकास चव्हाण, प्रा. अतुल निनगुरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. नितीन पोटे यांनी केले.



