ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडुन आदिवासी कॉलनी वर्धा येथील जुगार अड्डड्यावर धाड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 23/01/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन रामनगर वर्धा हडीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशीर माहीती मिळाली की आदिवासी कॉलनी वधी येथे राहणारी राणी राजेश यादव ही तिचे साथीदारांसह सट्टापट्टी जुगाराचा हारजीतचा खेळ चालवत आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहीती स्थानीक गुन्हे शाखा वर्चा चे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांनी सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांना देवुन त्यांनी दिलेल्या सुचना व निर्देषाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण स्थानिक गुन्हे शाखेचे पथका मार्फत पो. स्टे. रामनगर हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई दरम्यान यातील नमूद आरोपीतांवर सट्टापट्टी जुगाराचा रेड केला असता आरोपी क्र. 1) राणी राजेश यादव वय 36 वर्ष रा. इंदिरा नगर वर्धा हि आरोपी क्र 2) चेतन बब्बेसिंग ठाकुर वय 36 वर्ष रा. आदिवासी कॉलनी आर्वी नाका वर्धा व 3) शिवदास भीमराव पेंदोर वय 46 वर्ष रा. इंदिरा नगर आवी नाका वर्धा यांचे मदतीने लोकांकडून वरली मटक्याचे आकडे घेऊन आकडे घेऊन स्वतःचे फायदा करिता वरली मटका च्या जुगार खेळ खेळतांना मिळून आले तसेच आरोपी क्र. 3) कुणाल चंद्रशेखर फुलकर वय 29 वर्ष रा. इंदिरा नगर आवी नाका वर्चा 4) शिवदास भीमराव पेंदोर वय 46 वर्ष रा. इंदिरा नगर आर्वी नाका वर्धा 5) प्रफुल प्रभाकर ढगे वय 45 वर्ष रा. पिंपरी (मेघे) वर्चा 6) पंकज बाळाजी महाजन वय 36 वर्ष रा. मोरांगना तह. आवी जिल्हा वर्चा 7) मयूर देवराव तुपट वय 30 वर्ष रा. गजानन नगर आवी नाका वर्धा 8) पियूष संजय राऊत वय 19 वर्ष रा. वॉर्ड नं. 2 बोरगाव (मेघे) वर्धा हे 52 तास पत्त्यावर हारजीतचा जुगार खेळ खेळतांना रंगेहात मिळून आल्याने त्यांचे ताब्यातुन अंगझडती सट्टापट्टी नगदी 20,020 रुपये, 3 मोबाईल, 1 मोपेड, सट्टापट्टी जुगार चे साहित्य असा एकूण जु. की. 85,020/-रू चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करून आरोपीतांविरुद्ध पो.स्टे. रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो. उपनि. बालाजी लालपालवाले, पो. उपनि. राहुल इटेकार, पोहवा. चंद्रकांत बुरंगे, अमर लाखे भूषण निघोट, पो.शि. अमोल नगराळे, मंगेश चावरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये