ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील बारावी कला शाखेच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे कला शाखेच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नुकताच निरोप देण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, प्रा. नंदा भोयर, प्रा. प्रशांत पवार, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. प्रदीप परसुटकर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. विवेक पाल यांनी केले. प्रास्ताविक प्रा. आशिष देरकर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन प्रा. बाळू उमरे यांनी केले.

याप्रसंगी प्रा. संगीता पुरी, प्रा. सुधीर थिपे, प्रा. प्रताप शेंडे, प्रा. चेतना येरणे, प्रा. नरेंद्र हेपट, प्रा. सचिन भैसारे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन, महाविद्यालयातील अनुभव आणि मैत्रीचे क्षण सांगताना अनेक विद्यार्थी भावूक झाले.

उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, “महाविद्यालयाने दिलेल्या संस्कारांचा उपयोग करून जीवनात यशस्वी व्हा,” असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये