भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर महानगर कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी
नेताजींच्या राष्ट्रभक्तीचा आदर्श आत्मसात करा - आ. जोरगेवार

चांदा ब्लास्ट
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर महानगरच्या कार्यालयात आज महान स्वातंर्त्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी नेताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. नेताजींच्या राष्ट्रभक्तीचा आदर्श आत्मसात करण्याचे आवाहण यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री नामदेव डाहुले, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, महिला आघाडी महामंत्री सायली येरणे, बहुजन महिला आघाडी अध्यक्ष विमल कातकर, प्रा. श्याम हेडाउ, रामकुमार आकापल्लीवार, कल्पना शिंदे, अल्का मेश्राम, वंदना हजारे, रष्मी पांडे, संजय महाकालीवार, रेणुका येरणे, भाग्यश्री येरणे, छाया चवरे, शालीनी राउत, लिना साखरकर, बादल हजारे आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस हे केवळ स्वातंर्त्यसैनिक नव्हते, तर ते देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा” हा त्यांचा नारा आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगात स्फुरण चढवतो, नेताजींनी स्थापन केलेली आजाद हिंद सेना ही भारतीय स्वातंर्त्यलढ्याच्या इतिहासातील क्रांतिकारक पर्वाची साक्ष आहे. त्यांच्या धैर्याने, शिस्तीने आणि राष्ट्रभक्तीने प्रेरणा घेऊन आजच्या पिढीने देशसेवा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रउभारणीसाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, देशासाठी त्याग, निस्वार्थ सेवा आणि राष्ट्र प्रथम हीच नेताजींची खरी शिकवण आहे. आजच्या काळात त्यांच्या विचारांची अधिक गरज असून, प्रत्येक कार्यकर्त्याने नेताजींच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करावा. असे ते म्हणाले.



