ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ येथील सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला.

सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. उषा खंडाळे उपस्थित. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड. तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. पुरुषोत्तम माहोरे, व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. वंदना खणके व डॉ. निखिल देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. पुरुषोत्तम माहोरे यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देताना वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादा आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक काळजी याबाबत स्वयंसेवकांना विविध उदाहरणांद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक दर्शन मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोशन चौधरी यांनी मानले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये