ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या विद्यार्थ्यांनी साकारला भारतीय संस्कृतीचे प्रभावी दर्शन दर्शविणारा भारताचा नकाशा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       लोकसेवा मंडळ भद्रावती संचालित लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात साकारला भारताचा भव्य नकाशा. देशातील विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील ‘अनेकतेतील एकता’ रंगीबेरंगी स्वरूपात साकारली.

 मैदानावर रेखाटलेल्या या नकाशावर भारतातील विविध राज्यांची संस्कृती, परंपरा व वेशभूषा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सादरीकरणातून जिवंत केली.

रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांमुळे संपूर्ण नकाशा जणू सजीव झाला होता. हा उपक्रम भारतीय संस्कृतीची समृद्धी, विविधता आणि ‘अनेकतेतील एकता’ यांचे प्रभावी दर्शन घडवणारा ठरला. उपस्थितांनी या अनोख्या आणि देशप्रेम जागवणाऱ्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये